Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कळवण : हंडाभर पाण्यासाठी रात्रभर विहिरीत मुक्काम; आदिवासी महिलांना विहिरीत उतरून भरावे लागते पाणी

Share

कळवण । प्रतिनिधी : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्यातील पुनंदनगर ग्रुप ग्रामपंचायतीतील महाल व  जांभाळ या शेवटच्या गावांना तीव्र पाणी टंचाई जाणवत असून ग्रामस्थ महिलांना थेट विहिरीत उतरून लहान भांड्याने पाणी भरावे लागत आहे.

या खड्यात पाणी जमा होण्यास भरपूर वेळ लागत असल्याने एक हंडा पाण्यासाठी महिलांना तासनतास विहिरीत बसून राहावे लागत आहे. या भागात तात्काळ टँकरने पाणी पुरवठा सुरु करावा अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव व भाजपा आदिवासी आघाडी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र ठाकरे यांनी केली आहे.

कळवण तालुक्यात महिल्यांदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यात महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील कळवण तालुक्यातील पश्चिम पट्यातील शेवटची  पुनंदनगर ग्रुप ग्रामपंचायच्या महाल व जांभाळ या गावात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीं कोरड्याठाक पडल्याने मिळेल त्याठिकाणाहून पाणी आणण्यासाठी भटकंती करीत आहेत.
गावापासून दोन तीन किमी अंतरावरील विहिरीत उतरून तासंतास विहिरीच्य तळाशी असलेल्या खड्यात पाणी साचण्याची वाट पाहावी लागते. दोनतीन तासात एक हंडा भरेल एव्हडे पाणी या ठिकाणी जमा होते. येथील काही महिलांना पाण्यासाठी रात्रभर विहिरीत बसून रहावे लागते.
कळवण पासून ५५ ते ६० किमी अंतरावर असल्याने व शेवटचे गाव असल्याने याकडे अधिकारी कर्मचारी फिरकत नसल्याने हा भाग विकासापासून कोसो दूर राहिला आहे. ग्रामसेवकही आठवड्यातून एखाद्या दिवशी फिरकत असल्याने या भीषण टंचाईच्या काळात तक्रार करायची तरी कोणाकडे असा यक्ष प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.
या गावांना टँकरने    पुरवठा सुरु करावा अशी मागणी दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार भारतीताई पवार व गटविकास अधिकारी डी  एम बहिरम यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव व भाजपा आदिवासी आघाडी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र ठाकरे , ग्रामस्थांनी  केली आहे.
पुनंदनगर ग्रामपंचत अंतर्गत सात आदिवासी पाडे येत असल्याने व कळवण तालुक्यातील शेवटचे टोक असल्याने कळवण पंचायत समिती व जिल्हापरिषदेच्या  अधिकाऱ्यांनी  कायम दुर्लक्ष केले आहे. या भागात आदिवासी विकास विभागासह अनेक विभागणी विविध योजना राबविल्या आहेत. परंतु जवळपास सर्वच योजना कागदवरच राबवल्या गेल्याने येथील आदिवासी विकासापासून कोसो दूर राहिला आहे. त्यांना उपजीविका भागविण्यासाठी आजही दिंडोरी, निफाड व चांदवड तालुक्यात शेतमजूर म्हणून कामाला जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाई जाणवत आहे. मागणी करूनही टँकरने पाणी पुरवठा करण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे.
-अंबादास जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख
महाल , जांभाळ भागाचा दौरा केला असता . येथील पिण्याच्या पाण्याची भीषणता लक्षात आली. कळवण पंचायत समिती , तहसीलदार , प्रांत अधिकारी कळवण  येथे सर्वच खातेप्रमुखांची टंचाई बाबत मॅरेथॉन बैठक घेत आहेत. परंतु प्रत्येक्षात टंचाई बाबत कोणतेच ठोस पावले उचलताना दिसत नाही येथील आदिवासी आजही पाण्याच्या टँकरच्या प्रतीक्षेत आहेत . येथील गुरांना पाणी पाजण्यासाठी गुजरात राज्यात १५ किमी अंतरावर न्यावे लागत आहे.
-राजेंद्र ठाकरे – जिल्हा सरचिटणीस आदिवासी आघाडी 
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!