Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कळवण : बिबट्याच्या हल्ल्यात गुराखी जखमी

Share

पुनदखोरे। वार्ताहर : कळवण तालुक्यातील बारीपाडा (तिळवण बारी) येथे वनविभागाच्या हद्दीत डोंगरावरील जंगलात गुरे चरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कळवण तालुक्यातील बारीपाडा येथील वनविभागाच्या हद्दीत जंगल व डोंगर आहे. या ठिकाणी चाचेर येथील आदिवासी शेतकरी पिंटू तुळशीराम पवार (३४) हे गुरे चारण्यासाठी घेऊन गेले होते गुरे भागात चरत असतांना त्या ठिकाणी कपारीत असलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला मात्र प्रसंगावधान राखत पिंटू याने पळ काढला. दरम्यान बिबट्याचा पंजा कानावर बसल्याने कानाला जखम झाली तसेच तिथून पळ काढताना खड्डयात पडून पाय देखील मोडला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या इतर गुराखी मुळे बिबट्या पसार झाला. पिंटू यास स्थानिक लोकांनी प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळवले. जखमी पिंटू यास प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले.

भादवन येथील शिवारात बिबट्याचे वास्तव्य असून लवकरच या भागात दोन ठिकाणी पिंजरे लावण्यात येणार आहे. तसेच मानवी वस्तीवर जरी बिबटे येत नसतील तरी गुराख्यानी तसेच नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
-व्ही. डी. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!