Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कळवण : विषारी औषध प्राशन करुन शेतकऱ्याची आत्महत्या

Share

देसराणे : मोकभणगी ता. कळवण येथील शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान भगवान त्र्यंबक शेवाळे (४५) असे आत्महत्या करण्याऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. गुरुवार (दि.१७) रोजी रात्री आपल्या शेतातील घरात अज्ञात कारणावरून विषारी औषध सेवन केले. त्यांच्या कुटुंबीयांना ही बाब लक्षात येताच त्यांना कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वी मृत घोषित केले.

दरम्यान आत्महत्या ग्रस्त शेतकरी भगवान त्र्यंबक शेवाळे यांचे कडे मोकभणगी वि. का. संस्थेचे पिक कर्ज व मध्यम मुदत असे एकूण १४ लाख ३७ हजार सहाशे ७५ एवढे कर्ज होते, अशी माहिती त्यांचे बंधू मनोहर शेवाळे व पत्नी यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!