कळवण : बनावट एटीएम कार्ड तयार करून शेतकऱ्याला ९१ हजारांचा चुना

0

कळवण । प्रतिनिधी : बनावट एटीएम कार्ड तयार करून एटीएम मशीन मधून चोरटयांनी कळवण तालुक्यातील ओतूर शेतकऱ्याच्या खात्यातून ९१ हजार रुपये चोरी केल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्याने मुलीच्या शिक्षणासाठी पैसे बँक खात्यात ठेवले होते. चोरटयांनी त्यावरच हा साफ केला आहे.

आपले एटीएम कार्ड स्वतःच्या घरी असताना बनावट कार्डव्दावारे तुमच्या खात्यातील रक्क्म कोणी एकटीएम केंदातून काढून घेतली तर काहीसा असाच प्रकार कळवण तालुक्यातील शेतकरी बापू पोपट पगार याना अनुभवावा लागला आहे. बनावट एटीएम कार्ड तयार करून संशयिताने खात्यातून ९१ हजार रुपये लंपास केला असून कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि कळवण तालुक्यातील ओतूर येथील शेतकरी बापू पोपट पगार (४४) यांच्या भारतीय स्टेट बँक खात्यातून ३१ /१/२०१९ रोजी रात्री ११ वाजून ५६ मी. कोणी तरी अज्ञात इसमाने बनावट एटीएम कार्ड बनवून पनवेल येथील एटीएम मधून रोख रक्कम ९१ हजार रुपये काढून घेतले घेतले आहेत. एटीएम मध्ये बँक खात्यावरील व्यवहार करण्यासाठी सर्वाधिक वापर एटीएम कार्ड होत असल्यामुळे चोरट्याने लक्ष आता त्याकडे गेल्याने या घटनेने निदर्शनास आणून दिली आहे.

आता बनावट एटीएम कार्डद्वारे ग्राहकांची रक्कम लंपास होण्याचा हा वेगळाच प्रकार पुढे आला आहे. या पद्धतीने आपल्या खात्यातील जवळपास ९१ हजार रुपयाची रक्कम लंपास झाल्याची तक्रार कळवण पोलीस ठाण्यात बापू पोपट पगार यांनी दिली आहे. एटीएम कार्ड आपल्याकडे असताना ही रक्कम केंद्रातून काढली गेल्याने ते देखील चक्रावून गेले आणि त्यांनी कळवण ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला.

बनावट एटीएम कार्डाचा वापर करून फसवणुकीचा बहुधा ही तालुक्यातील पहिली घटना आहे. पुढील तपास कळवण पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

LEAVE A REPLY

*