Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कळवण : चुलत काकाचा आठ वर्षीय पुतणीवर अत्याचाराचा प्रयत्न

Share

पुनदखोरे : कळवण तालुक्यातील जिरवाडा येथील माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असुन चुलत काकाने त्याच्या ८ वर्षाच्या पुतणीवर अत्याचार करण्याचा  प्रयत्न केला असून त्यास अभोणा पोलिसांनी अटक केली असुन  त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत असे की , कळवण तालुक्यातील अभोणा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या जिरवाडा येथील रहिवाशी कमलाकर जाधव व त्यांची पत्नी मंगलबाई आपल्या तीन मुलांबरोबर राहतात. संशयित नारायण जाधव हा कमलाकर जाधव यांचा चुलत भाऊ आहे. (दि. २६) रोजी नारायण जाधव याने घराशेजारी खेळत असलेल्या कमलाकर जाधव यांची ८ वर्षाची मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्या घरात नेट त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईने शोध घेतला असता संशयित नारायणच्या मुलाने घरात नेले असल्याची माहिती दिली. त्यामुळे लागलीच मुलीच्या आईने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयित नारायण मागील दाराने पळून गेला. यावेळी मुलीने घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या आईने फिर्याद देण्यापूर्वी संशयित नारायण जाधव याने फिर्याद करू नका अशी धमकी दिली होती.

याबाबत पिडीत मुलीच्या आई वडीलांनी ग्रामस्थांच्या मदतीने अभोणा पोलिस ठाण्यात आरोपी नारायण विरोधात तक्रार दाखल केली असता अभोणा पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्या विरोधात भा .द .वि .३७६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असुन त्यास कळवण न्यायलयापुढे हजर केले असता त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात केली आहे. पुढील तपास पो .नि. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो .उ. नि .डी .एच . बागुल, व्ही.सी. चौधरी आदी करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!