कळवणच्या अमित कोठावदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

0

कळवण : मुख्यमंत्री फेलोशिप २०१७ उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील अमित कोठावदे या युवकाचा मुख्यमंत्री कार्यालयात सन्मान करण्यात आला.मंत्रालयात पार पडलेल्या प्रमाणपत्र सोहळ्यात अमित कोठावदे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

अभियांत्रिकीची पदवी घेतलेले अमित रवींद्र कोठावदे यांची २०१७ साली मुख्यमत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी निवड झाली होती. अमित यांनी आंतरराष्ट्रीय कंपनीत मिळालेली नोकरी सोडून ह्या उपक्रमात सहभाग घेतला.त्यानंतर त्यांना मुंबई मंत्रालय येथे काम करण्याची संधी मिळाली.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुंगटीवार यांच्या सोबत अमित यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.शासनाच्या पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी अमित यांनी प्रयत्न केले.याबरोबरच ग्रीन आर्मी , इको टुरिझम चा विस्तार होण्याकरिता देखील शाश्वत विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केल्याचं अमित यांनी सांगितलं.

सी एम फेलो म्हणून काम करत असताना त्यांना राजकीय, सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक आणि प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधता आला असे अमित यांनी सांगितले.तसेच शासन व्यवस्था प्रत्यक्ष अनुभवता आली. यापुढेही सामाजिक कार्य करून शासन आणि जनता यांच्यातील दुवा होण्याचा अमित यांचा मानस आहे.

LEAVE A REPLY

*