नाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी

0

नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व मेसन डेव्हलपर्स च्या सहकार्याने आयोजित हकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाशिक जिमखाना संघाने एनडीसीए मॉर्निंग संघाचा ८५ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.

५० षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात नाशिक जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु तेजस पवार व मित पटेलच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर नाशिक जिमखाना संघ १६७ धावात गारद झाला.विकास वाघमारे याने ३३ तर सुजय महाजन याने ३१ धावा केल्या. तेजस व मित ने प्रत्येकी ३ गडी बाद केले.

५० षटकात १६७ धावांचे सोपे आव्हान घेउन मैदानात उतरलेला एनडीसीए मॉर्निंग संघ रणजीपटू सत्यजित बच्छाव यांच्या भेदक मार्‍यापुढे ८२ धावात गारद झाला सत्यजित ने १५ धावांमध्ये ५ गडी बाद केले तर गौरव काळे याने ४ गडी बाद करत त्यास उत्कृष्ट साथ दिली. दोघांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे नाशिक जिमखाना संघाने विजेतेपद पटकावले.

LEAVE A REPLY

*