Type to search

नाशिक

मोखाड्यात राष्ट्रवादीचा रास्तारोको

Share

मोखाडा : वाढती महागाई व तालुक्यातील रस्त्यांना पडलेले खड्डे याविरोधात मोखाडा राष्ट्रवादीकडून दोन तास रास्तारोको करून खड्डयात झाडे लावून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी खड्डे भरण्याचे आश्वासन दिले, तर तहसीलदारांनी हे निवेदन वरीष्ठ कार्यालयाला पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.

रास्तारोको वेळी मोखाडा, खोडाळा, जव्हार, नाशिक रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी तहसिलदार व पोलीसांनी हस्तक्षेप करून या मागण्यासंर्दभात आश्वासन दिल्यानंतर हा रास्तारोको स्थगित करण्यात आला. तालुकाध्यक्ष प्रमोद कोठेकर, प्रदेश सरचिटणीस एकनाथ पवार, शहराध्यक्ष रफीक मनियार, कार्याध्यक्ष राजेंद्र कटीलकर, सुनिल कस्तुरे, नगरसेविका वैशाली माळी, फारूख फकीर, सोहील मनियार, लता राऊत आदी उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!