Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘मीच सोशल मिडिया पिडीत असून फेसबुकवर एकही अकाउंट नाही’ : नांगरे पाटील

Share

नाशिक । प्रतिनिधी
व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, युट्यूब अशा विविध सोशल साईटवरून काहीही पोस्ट आपल्या नावाने खपवल्या जात आहेत. अखेर सायबर विभगाला सांगून आपण 19 बनावट फेसबुक पेजेस, 7 युट्यूब तर व्हॉटसअ‍ॅपवरील अनेक पोस्ट काढायला लावल्या आहेत. यामुळे ‘मीच सोशल मिडिया पिडीत’ आहे असे सांगत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी खंत व्यक्त केली.

गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मोफत पुस्तके, मोफत संसार साहित्य, मोबाईल कॅमेर्‍यातील फ्लॅशमुळे झालेला स्फोट, युपीएसएसी परिक्षेतील अवघड प्रश्न, मुले पळवणारी टोळी असे बरेच काही डॉ. विश्वास नांगरे पाटील यांच्या नावावर सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात येते. यासाठी अनेकदा माझे मोबाईल नंबर मिळवून आपणास विचरणा होते. त्यांची समजुत काढताना अपाणास नाकीनऊ येत असल्याचेही नांगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.

आपण फेसबुक पासून चार हात दूर आहोत. व्हॉटअ‍ॅप, इन्स्टाग्राम असले तरी त्याचा केवळ कामापुरताचा आपण वापर करतो. नाशिकमध्ये आल्यापासून या विषयाबाबत अनेकदा माझ्याकडे विचारणा करण्यात आली. मी स्वत: सोशल मिडीयाचा फारच कमी विशेषत: कार्यालयीन कामासाठी त्याचा वापर करतो.

फेसबुकवर माझे अकाउंटच नसून, त्याबाबतची माहिती ठेवत नाही. त्यामुळे या सर्व प्रकाराची माहिती घेण्याविषयी सायबर पोलिसांना सांगितले. सायबर पोलिसांनी तब्बल 17 पेजेस शोधली. ही पेजेस माझ्या नावाने असल्याने ती सर्व हटवून टाकण्यात आली आहे.

तरूणांचे आयडॉल व आपल्या खास वक्तृत्व शैलीने तरूणाईची मने जींकणारे विश्वास नांगरे पाटील यांचे फेसबूकवर स्वत:चे अकाउंटसुध्दा नसल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी पत्रकार परिषदेतच केला. यामुळे त्यांच्या नावाने फिरणार्‍या पोस्टस्, व्हिडिओ हे बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले नागरिकांनी कोणात्याही मॅसेजेसबाबत खात्री करावी, असे आवाहन देखील नांगरे पाटील यांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!