Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर : अज्ञात टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण

Share

इंदिरानगर  :पाथर्डी फाटा ते वडनेर गेट रस्त्याने मोटरसायकलवरून जात असताना मुलीला बघून शिट्टी वाजवली त्याचा जॉब विचारला असता एकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरत पोपट गिते (वय ३५ रा.गिते मळा चेहेडी ) हे (दि ३१) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आपल्या मैत्रिणी सोबत पाथर्डी गावाकडून वडनेर गेट कडे जात असताना जय मल्हार हॉटेल जवळ पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या तीन ते चार अज्ञात युवकांनी गिते यांच्या सोबत असलेल्या मुलीला बघून शिट्टी वाजवली त्यांनी त्याचा जाब विचारला असता अज्ञात युवकांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करत जबर जखमी केले.

तसेच सोबत असलेल्या मुलीला देखील मारहाण करण्यात आली. तेथे बघ्यांची गर्दी जमा झाल्याने मारहाण करणारे अज्ञात युवक दुचाकीने पसार झाले. याप्रकरणी गीते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल जगताप अधिक तपास करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!