Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर : पांडवनगरी जाळपोळ प्रकरणी दोन संशयित ताब्यात

Share
इंदिरानगर : अनैतिक संबधावरून झालेल्या खुनातील संशयितास अटक Latest News Nashik Murder Suspect Arrested on Immoral Relationship Case

इंदिरानगर : पांडवनगरी येथील दुचाकी जाळपोळ प्रकरणी दोन संशयितांना गुन्हे शाखा युनिट २च्या पथकास यश आले आहे. काल (दि. १४) रोजी दुपारी वडाळा गावात सापळा रचून अटक करण्यात आली. गणेश जडबुले(२५) राहणार रामोशी वाडा वडाळा गाव, उत्तम साळवे (२४) रा राजवाडा वडाळा गाव अशी संशयितांची नावे असुन त्यांना इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडव नगरी परिसरात आकाश आरंभ सोसायटी असून यामध्ये राहणारे अजय उपासणी यांच्या दोन दुचाकी जाळल्याची घटना घडली होती. (दि. १२) ऑगस्ट रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास सोसायटीच्या वाहनतळात लावण्यात आलेल्या या दोन्ही दुचाकी जाळण्यात आल्या होत्या.

याप्रकरणी उपासनी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट २ चे युवराज पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोघा संशयितांना मुसक्या आवळण्यात यश आले. शनिवार (दि. १४)रोजी सापळा रचून दुचाकी जाळपोळ प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे.

सदर कामगिरी गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  दिनेश बर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी अभिजीत सोनार, पोउनी विजय लोंढे, युवराज पाटील, श्रीराम सपकाळ, प्रमोद दराडे, अन्सार सय्यद, नितीन भालेराव, बाळा नांद्रे, योगेश सानप, महेंद्र साळुंखे, संतोष ठाकूर यांच्या पथकाने केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!