Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या दोन मुलांची सुखरूप सुटका

Share

इंदिरानगर वार्ताहर : निसर्ग रम्य वातावरणात पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या आणि वाट चुकलेल्या दोन मुलांची आज जलद प्रतिसाद पथक, वैनतेय गिर्यारोहण संस्था ,नवीन नाशिक अग्निशामक दल आणि इंदिरानगर पोलीस यांच्या पथकाने सुखरूप सुटका केली .

गोविंद नगर येथील निलय कुलकर्णी आणि त्याचा मित्र गर्व सावलानी हे दोघे त्यांच्या दोन मित्रांसह येथे सकाळी साडेसात वाजता ट्रेकिंगला आले होते .नऊ वाजेच्या सुमारास वाट चुकल्याने त्यांना खाली उतरणे अवघड झाल्यानंतर त्यांनी मित्रांना ही माहिती दिली. मित्र आणि नातेवाईकांनी वैनतेय संस्थेचे भाऊसाहेब कानमहाले यांना ही माहिती दिली.

त्यानंतर मुलांच्या पालकांसह प्रणव भानुसे आणि रोहित हिवाळे घटनास्थळी पोहचले. दरम्यान इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी आणि जलद प्रतिसाद पथकाचे उपनिरीक्षक समाधान हिरे, अग्निशामक विभागाचे अविनाश सोनवणे, मोईन शेख, कांतीलाल पवार सहकाऱ्यांसह घटनास्थळी त्वरित दाखल झाले

तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर या दोघा युवकांना सकाळी ११ वाजेच्या सुमारास खाली उतरवण्यात यश आले. दोन दिवसापूर्वीच अशोका मार्ग येथील पाटील दांपत्य देखील याच डोंगरावर फसल्यानंतर त्यांना देखील रेस्क्यू करण्यात आले होते. दिवसा नजीकच्या या घटनात वाढ होत असल्याने संबंध यंत्रणेने आता ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!