Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर : पलंगावरून पडून तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

Share

इंदिरानगर : खेळतांना पलंगावरून खाली पडून एका तीन वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाथर्डी फाट्याजवळील वासन नगर या ठिकाणी घडली.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार भाग्यश्री हनुवटे (वय ३) असे मयत चिमुरडीचे नाव आहे. गुरुवारी (दि.०५) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पलंगावर खेळत असताना खाली पडून तिच्या डोक्यास जबर मार लागला. तिला उपचारासाठी त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना (दि. ०५) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून व पोनि महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह एस.जी भोजने अधिक तपास करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!