Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर : परिसरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ

Share

इंदिरानगर : इंदिरानगर मध्ये मागील काही दिवसापासुन सोनसाखळी चोरट्यांनी परिसरात धुमाकूळ घातल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इंदिरानगर भागात सातत्याने सोनसाखळी ओरबाडून पोबारा करण्याच्या घटना घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे

येथील चार्वाक चौक येथे एक ज्येष्ठ महिला गाईला घास घालत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी तीस हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र बळजबरीने ओरबाळुन नेल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहिणी रत्नाकर काळे (वय ५० राहणार वैद्य अपार्टमेंट आत्मविश्वास सोसायटी चार्वाक चौक) (दि.०७) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घरासमोर गाईला घास घालत असताना काळ्या रंगाच्या एफ झेड सारख्या दिसणाऱ्या दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून नेले. त्यातील अर्ध मंगळसूत्र तुटले व अर्धे चोरट्याने लांबविले.

याबाबत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जबरी. चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी  महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत आहेत

इंदिरानगर परिसरात सोनसाखळी लांबविण्याच्या घटना चक्क नागरिकांच्या दरापुढे घडत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. यामुळे महिलावर्गांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इंदिरानगर परिसर ज्येष्ठ नागरिकांची वसाहत म्हणून ओळखला जातो. या भागात सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. सकाळ-संध्याकाळ त्यांची परिसरातील रस्त्यांवर वर्दळ असते. याचवेळी चोरट्यांकडून त्यांना लक्ष्य केले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!