Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर : पांडव नगरी परिसरात अज्ञाताने दोन दुचाकी जाळल्या

Share

इंदिरानगर : येथील पांडव नगरी भागात ( दि. २७) मंगळवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या दोन दुचाकी जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. शहरात दुचाकी जाळपोळीच्या घटना पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी कामटवाडे नवीन नाशिक येथे मागील भांडणाची कुरापत काढून दोन दुचाकी जाळण्यात आले होत्या.

शहर परिसरात समाजकंटकांकडून दुचाकी जाळण्याचे प्रकार कायम घडत असून या प्रकाराला काही अंशी आळा बसला होता. परंतु पुन्हा या प्रकाराने डोके वर काढले असून या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय मोरेश्वर उपासने रा. आकाश आरंभ सोसायटी पांडव नगरी यांच्या मालकीच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दोन दुचाकी हिरो होंडा स्प्लेंडर (क्रमांक एमएच १५ बी झेड -७५४०) व स्कुटी पेप (क्रमांक एम एच १५ बिजे ५१५७ अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून पेटवून दिली.

यात दोन्ही दुचाकी संपूर्ण जळून खाक झाल्या असून उपासने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!