Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर : पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यास तब्बल चार तास नागरिकांनी डांबले

Share

इंदिरानगर । वार्ताहर : पाणी असूनही मनपाच्या भोंगळ कारभारामुळे सदिच्छा नगर भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

वडाळा पाथर्डी रोड लगत सदिच्छा नगर भागात महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असुन पायपीट करत खासगी विहिरीवर पाणी घेण्यासाठी जावे लागत आहे.

गेल्या आठ दिवसापासून तर या भागात पाणी जास्त वेळ न थांबल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार होती. यासाठी पाठपुरावकारु, निवेदने देऊनही सुधारणा होत नसल्याने आज येथील नागरिकांनी सावध पवित्र घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

दरम्यान यावेळी सदिच्छा नगर येथील नागरिकांनी आज पाणी सोडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला तब्बल चार तास बसवून ठेवले. अधिकारी येत नाही तोपर्यंत सोडणार नाही, असा पवित्रा घेतला. सायंकाळी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. मात्र समस्या सुटली नाही तर लगेचच विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!