Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिडको : नफ्याचे आमिष देत पन्नास लाखांची फसवणूक

Share

इंदिरानगर : खाजगी बस देण्याचे व नफ्यात दररोज दीड ते दोन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून तब्बल पन्नास लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात पाच संशयित आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी नवीन आचार्य राहणार कर्नाटका, मेघा कलकोट, समीर कलकोट, कल्पना पाटील, श्रद्धा इंगोले (रा. इंदिरानगर) फिर्यादी रमेश गवाल (वय ७० रा .आर्टलेरी सेंटर रोड खोडे मळा उपनगर) यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांचे ओळखीचे मेघा
कलकोट, कल्पना पाटील, श्रद्धा इंगोले व त्यांच्यासोबत समीर कलकोट (रा.इंदिरानगर) यांनी फिर्यादी गवाल यांना आम्ही तुम्हाला आमच्या ओळखीने कर्नाटक येथील नवीन आचार्य यांच्याकडून दोन बस घेऊन देतो, अशी बतावणी करून फोनवर बोलणे करून दिले.

तसेच मेघा व समीर कलकोट यांनी दि. २६ एप्रिल बोरिवली येथील हॉटेल गोकुळ प्लाझा येथे नवीन आचार्य याच्याशी मीटिंग करून दिली. मीटिंगमध्ये सांगितले की तुम्ही मला पन्नास लाख रुपये द्या मी तुम्हाला दोन बस व त्यासोबत अग्रीमेंट पाठवून देतो व त्या बसेस बेंगलोर मुंबई या मार्गावर चालून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी दररोज दीड ते दोन लाख रुपये तुम्हाला पाठविणे असे म्हणत विश्वास संपादन करून वेळोवेळी रोख व चेकद्वारे ५० लाख रुपये फिर्यादी यांच्याकडून घेतले.

त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सात लाख रुपये फिर्यादी यांच्या खात्यावर पाठवले. त्यानंतर पैसे पाठविणे बंद केले म्हणून त्यांनी कलकोट यांना सांगितले असता आचार्य हा लवकर तुमच्या दोन बसेस व पंचवीस लाख रुपये परत करणार आहे असे सांगितले परंतु अद्याप पर्यंत पैसे परत दिले नाही.

याप्रकरणी रमेश गवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश भोजणे अधिक तपास करीत आहेत

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!