Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर : भावे प्लास्टो चोरी प्रकरणी तिघांना अटक

Share

इंदिरानगर । वार्ताहर : साईनाथ नगर येथील भावे प्लास्टो दुकानात चोरी प्रकरणी (दि. २८) इंदिरानगर पोलिसांनी दोन महिला व एका पुरुषाला अटक केली आहे.

अधिक माहिती अशी कि (दि. २८) रोजी सायंकाळच्या सुमारास दोन अनोळखी महिला व एक इसम पूजा कांबळे यांच्या दुकानात गेले. या ठिकाणी त्यांनी टप घेण्याचे निमित्त करून संशयित महिला आरोपींनी कांबळे यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या बरोबर असलेला इसमाने पर्स चोरून नेली होती. या पर्समध्ये तीन हजार रुपये होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

पोलीस गुन्ह्याचा तपास करत असताना दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपींची ओळख पटवून गुप्त माहितीच्या आधारे अंजनेरी येथील एका लॉजमधून संशयित आरोपी सोनाली अर्जुन कांबळे (२८) रा. शिवाजीनगर सातपूर, उन्नती कैलास खादम(३५) रा कालिकामाता मंदिरामागे सहवास नगर, निलेश उर्फ विकी शशिकांत खंडीझोड (वय २३) रा गंगा सागर नगर श्रमिक नगर, सातपूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ५० हजार रुपये किमतीची दुचाकी व आठ हजार रुपये रोख असे एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अंकुश दांडगे, रियाज शेख, राजेश निकम, भगवान शिंदे, दत्तू पाळदे, राजू राऊत, दत्तात्रय गवारे, विमल पाचोरे यांच्या पथकाने केली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!