श्री श्री रविशंकर मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, एक ठार पाच गंभीर

0

नाशिक : अशोका मार्गावरील श्रीश्री रवी शंकर मार्ग परिसरात एका तुफान स्पिडने आलेल्या इर्टीका कारने दुचाकीस्वारास उडविल्यानंतर कार अनियंत्रीत झाल्यामुळे या कारने अनेक वाहनांना धडक देत चार पलट्या घेतल्या. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून इर्टीकातील दोन जण जखमी झाले आहेत. तर एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणेरोडला जोडणारा डीजीपी नगर ते इंदिरानगर मार्गावरील रविशंकर मार्ग परिसरात रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. इंदिरानगर कडून भरधाव आलेल्या इर्टीका कारने पुढे जाणाºया दुचाकीस्वारास धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. रात्री उशीरापर्यंत त्याची ओळख पटू शकली नाही. दुचाकीस्वारास उडवीत या इर्टीका कारने पुन्हा स्विफ्ट डिझायर आणि इंडिया कारला धडक देत पलटी घेतली.

अपघात इतका भयंकर होता की, सर्व वाहनांची विरूध्द दिशेला तोंडे फिरली त्यात इर्टीकाने चार पलटी घेतल्याने कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले असून परिसरातील नागरीकांनी मदत वेळीच मदत कार्य हाती घेतल्याने त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच इंदिरानगरसह मुंबईनाका आणि उपनगर पोलिसांनी धाव घेत इर्टीका कारमधील एकास ताब्यात घेतले असून हा अपघात इर्टीकामधील तीघांनी मद्यसेवन केलेले असल्याने झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते.

LEAVE A REPLY

*