Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

देवळा : निवडणूक खर्च सादर न केल्याने आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

Share

खामखेडा : चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रकाश गोपाळ कापसे यांच्यावर निवडणूक खर्चाचा तपशील सादर न केल्याने आचारसंहिता भंगाचा चांदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला २८ लाखांपर्यंत खर्च करण्याची अनुमती आहे. या मर्यादेतच निवडणूक खर्च करावा तसेच निवडणूक खर्चाची माहिती विहित मुदतीमध्ये निवडणूक यंत्रणेकडे द्यावी लागते.उमेदवारांनी मुदतीत आणि दिलेल्या वेळेतच निवडणूक विभागाकडे खर्चाची माहिती देण्याचे बंधन असते.

निवडणुकीत होणाऱ्या खर्चाचा अहवाल उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक असते.या अहवालाची वेळोवेळी लेखाधिकारी यांच्या मार्फत तपासणी केली जाते.आणि खर्च निरीक्षक यांच्यामार्फ़त पडताळली जाते .याचप्रमाणे १३ ऑक्टोबर रोजी चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघातील सर्व उमेदवारांना निवडणूक खर्च तपासणी साठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या परंतु अपक्ष उमेदवार प्रकाश कापसे या तपासणीसाठी गैरहजर असल्याने त्यांना नोटीस देण्यात आली होती.

परंतु ते यांबाबत समाधानकारक खुलासा न करू शकल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली. तसेच प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक असते व त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना देने बंधनकारक असते. परंतु कापसे यांनी बँकेची माहिती न दिल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कापसे यांच्यावर निवडणूक खर्च सादर न केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा चांदवड पोलीस स्टेशनमध्ये केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!