Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

लासलगाव येथील ११ कांदा व्यापाऱ्यांवर आयकरची धाड; साठेबाजीचा संशय

Share

लासलगाव : प्राप्तीकर खात्याने आज जिल्ह्यातील कांदा व्यापार्‍यांना दणका दिला असून साठेबाजीच्या संंशयावरून लासलगाव,येवला,पिंपळगाव आदी ठिकाणच्या 11 प्रमुख बड्या व्यापार्‍यांच्या कार्यालयांवर छापे टाकले.सायंंकाळी उशिरापर्यंत व्यवहारांची माहिती घेण्याचे काम सुरू होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे कांदा व्यापार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

कांदा व्यापार्‍यांचे कार्यालय व कांदा साठवलेल्या खळ्यांवर प्राप्तीकरकडून एकाचवेळी अचानक धाडसत्र पार पडले. दरम्यान, या कारवाईच्या निषेधार्थ व्यापार्‍यांनी कांदा लिलाव बंदचे अस्त्र उपसले आहे. कांदा व्यापार्‍यांचे आर्थिक व्यवहार व कांदा साठवणुकीच्या शक्यतेने येथील चार व्यापार्‍यांची आयकरकडून तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळाली. या कारवाईत अधिकार्‍यांनी चारही कांदा व्यापार्‍यांचे गेल्या पाच बड्या कांदा व्यापार्‍यांंवर जिल्ह्यात ‘प्राप्तिकर’ छापे

वर्षांपूर्वीच्या आर्थिक व्यवहाराचे तपशील, कागदपत्रे व कांदा साठवणीची तपासणी केल्याची माहिती मिळाली आहे.
वाढलेले कांदा भाव, अतिवृष्टीने झालेले नुकसान, नवा कांदा येण्यास होणारा विलंब यामुळे निर्माण होणारी तूट भरून काढण्यास केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात कांदासाठा संपुष्टात आला आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध असताना नफाखोरीच्या उद्देशाने व्यापार्‍यांकडून अतिरिक्त कांदासाठा केला जातो का याची खातरजमा करण्यासाठी ही पथके सर्वात मोठ्या कांदा आगारात दाखल झाल्याचे वृत्त आहे.

देशांतर्गत कांदा दराला लगाम घालण्यासाठी कांदा साठवणुकीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांकडून आवक, विक्री व शिल्लक साठ्याचा दैनंदिन अहवाल मागवत कांदा साठवणुकीवर नियंत्रण ठेवले जात आहे.

कांदा कसा साठवणार?
दरम्यान, केंद्र सरकार हेतुपुरस्सर व्यापार्‍यांना लक्ष्य करीत आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध करीत नाईलाजास्तव कांदा लिलाव बंद ठेवावे लागत आहे. आयकर विभाग कांदा व्यापार्‍यांवर अशा धाडी टावत असेल तर कांदा कसा खरेदी करायचा, तो साठवायचा कसा व कोठे, असे प्रश्न एका कांदा व्यापार्‍याने प्रस्तुत प्रतिनिधीसमोर उपस्थित केले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!