Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : जुन्या नाशिक मध्ये पुन्हा वाड्याची भिंत कोसळली

Share

नाशिक : शहरातील जुन्या नाशकातील संभाजी चौक परिसरात बोरसे वाड्याची भिंत कोसळण्याची घटना घडली आहे. घराची भिंत पडत असल्याचे वेळीच लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत बचाव केला.

या दुर्घटनेत संबंधीत घरातील वस्तूंचे नुकसान वगळता इतर कोणतीही मोठी हानी झालेली नाही. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

गेल्या आठवडाभरापासून शहरात संततधार सुरु आहे. त्यामुळे शहरात सूर्याचे दर्शनही झालेले नाही. त्यातच जुन्या नाशकात अनेक पुरातन वाडे असून हे वाडे मातीचे आणि लाकडी बांधकामाचे असल्याने पावसामुळे भिजून या वाड्यांची पडझड होत आहे.

गेल्या महिनाभरात शहरात पावसामुळे भिंत पडल्याच्या दोन मोठ्या दुर्घटना घडल्या असून यासाठी प्रशासन वेळोवेळी सूचना देऊनही नागरिक ऐकत नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!