Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदगाव तालुक्यात खरीप पेरणीची लगबग सुरू

Share

नांदगाव। प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यात विविध भागात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.

विशेषतः उकाड्यापासून सुटका झाली आहे. परंतु पेरणीसाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. नांदगाव तालुक्यात ६५ टक्के पेरण्या पुर्ण झाल्या असल्याचे कृषीविभागा मार्फत सांगण्यात आले आहे. दरम्यान आज दुपारी संततधार पावसाने सुरुवात केली होती.

जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या खोळंबल्या होत्या.दुष्काळाच्या चटक्याने त्रस्त असलेले शेतकरी पावसाने पाठ फिरवल्याने हैराण झाले होते.चातक पक्षाप्रमाणे शेतकरी पाऊसासाठी वाट पाहत होते. अखेर जुन महिन्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडल्याने पेरण्या सुरू झाल्या आहेत.

नांदगाव तालुक्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. जुन महिनेच्या शेवटी पावसाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे. यंदा पावसाने उशिरा आल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी उशिरा सुरू केली आहे.पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पाऊस पडल्याने गावातील शेतकरी कुटुंबातील सदस्यासह शाळकरी मुलांनी शेतीकडे धाव घेतली आहे. गुरुवारी नांदगावचा आठवड्याचा बाजार असल्याने बाजारपेठत गर्दी झाली होती.तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. सुखावलेल्या शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरत पेरणीची लगबग सुरु असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!