Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण कमी

Share

नाशिक | संदिपकुमार ब्रह्मेचा : गणेशोत्सव साजरा झाला… पण ध्वनी प्रदूषण झाले नाही…. हे वाचुन कदाचित आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळांनी,सामाजिक संस्था नी केलेले प्रयत्न सार्थकी लागले आहेत. ही नाशिककरांसाठी निश्चितच आनंददायी बातमी आहे. यंदाच्या गणेशोत्सवाला तसा विधानसभा निवडणुकीचा रंगही काही प्रमाणात आलेला होता . त्यामुळे गणेशोत्सवात दणदणाट होणार अशी शक्यता दिसत होती. मात्र प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने गणेशोत्सव काळात उप प्रादेशिक अधिकारी ए. एम. करे यांच्या अधिपत्याखाली पाच जणांचे पथक नेमले होते.

पथकाने सायंकाळी सहा ते दहा वाजेच्या दरम्यान शहरातील नाशिकरोड, पंचवटी, सिव्हील हॉस्पिटल, सातपुर, त्रिमूर्ती चौक येथून नॉइज मीटर द्वारे ध्वनी प्रदूषणाचे नमुने अश्वमेध ह्या एजन्सी द्वारे घेतले होते. त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळास नुकताच प्राप्त झाला त्यातून हे सिद्ध झाले आहे. ह्या सर्व ठिकाणापैकी २ सप्टेंबर रोजी त्रिमूर्ती चौक येथून ८५% आवाज अर्थात ध्वनी प्रदूषण वगळता शहरात ७०% पेक्षा कमी ध्वनी प्रदूषण झाले आहे.

सर्व नाशिककरांनी आणि मंडळांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव दिलेली साथ निश्चितच मोलाची आहे . त्यामुळेच यंदा जल आणि ध्वनी प्रदूषण झाले नाही . ही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने खुप मोठी गोष्ट आहे

डॉ. जी.बी. संगेवार, प्रादेशिक अधिकारी
महाराष्ट्र प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!