Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिककरांनो सावधान! कोरोना भितीचा काळाबाजार; बनावट लस देऊन उकळले जातायेत पैसे

Share
नाशिककरांनो सावधान! कोरोना भितीचा काळाबाजार; बनावट लस देऊन उकळले जातायेत पैसे, nashik illegal Vaccine on the name on corona virus nashik breaking news

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये कोरोना संशयितांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या असल्या तरी वर्दळीच्या भागात कोरोना लसीच्या नावाने मोठा काळाबाजार सुरु आहे. काही महिला कोरोनाची लस असल्याची बतावणी करून नागरिकांकडून पैसे उकळत आहेत. कोरोनाच्या भीतीने धास्तावलेले नाशिककर पोलिओच्या डोस प्रमाणे असलेला डोस लहान मुलांना देऊन घेत आहेत. यामध्ये नोंदणी फी आणि डोसची फी या महिला अनधिकृतपणे वसूल करताना नजरेस पडत आहेत.

गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी कोरोना संशयित रूग्ण आढळून आल्यानंतर नाशिकमध्ये प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आली. अधिक दरात मास्कविक्री करणारे, अतिरिक्त दरात सॅनिटायझर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, शहराच्या काही वर्दळीच्या भागात काही महिला लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधित लसीची सर्रास विक्री करताना आढळून आल्या आहेत.

विशेष म्हणजे या महिला पुण्यातील सामाजिक संस्थेकडून आल्याची बतावणी करून विश्वास संपादन करतात. तसेच नोंदणी फी १५ रुपये आणि कोरोना प्रतिबंधित लसीची फी १०० रुपये असे एकूण ११५ रुपये प्रत्येक घरातून उकळवत असलायचे निदर्शनास आले आहे.

लस दिल्यानंतर महिला या परिसरातून निघून गेल्या. मात्र, यानंतर ज्या मुलांना लस देण्यात आली आहे, त्या मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रासदेखील होत होता. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी या महिलांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्या मिळून आल्या नाहीत.

शासनाकडून अशा कुठल्याही लसी घरोघर जाऊन दिल्या जात नाहीत अशी माहिती अनेकदा वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य मंत्र्यांनी दिली असतानादेखील सध्या कोरोना व्हायरसबाबत सर्वत्र येत असलेल्या बातम्या, सोशल मीडियातील माहिती यामुळे नागरिक धास्तावले आहेत. मात्र, अशी कुठलीही लस दिली जात नसून नागरिकांनी भीतीपोटी आपल्या पाल्यांचे नुकसान करून घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!