Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

गटारीच्या पार्श्वभूमीवर लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त

Share

नाशिक । प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने आषाढी अमावस्या (गटारी) च्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागासह जिल्हाभरात नाकाबंदी करून कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत आज औरंगाबाद रोडवर छापा टाकत या विभागाच्या पथकाने अल्टो कारसह विदेशी मद्याचा सुमारे एक लाख रूपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत केला आहे. तर एकास अटक करण्यात आले आहे.

आनंद पद्मनाभ शेट्टी (54 रा.राजेंद्र कॉलनी,हल्ली वास्तू वैभव हाईटस,पाथर्डी फाटा) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अवघ्या तीन दिवसांवर गटारी अमावस्या आली असून यासाठी आतापासूनच सर्वांची तयारी सुरू आहे. मद्यविक्रेतेही या कालावधीत मद्याचा साठा वाढवतात. याचा फायदा उचलत अवैध मद्य वाहतुक व विक्री करणारेही सक्रिय होतात.

त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निमित्त राज्य उत्पादन शुल्क विभगाने सिमावर्ती भागातून होणारी बेकायदा मद्यवाहतूक, विक्री आणि उत्पादन आपल्या रडारवर घेतले आहे. या निमित्त शहरासह जिल्हाभरात ठिकठिकाणी नाकाबंदीद्वारे कारवाई केली जात आहेत.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सोमवारी पथक क्र.1 चे दुय्यम निरीक्षक प्रविण मंडलिक यांना मिळालेल्या माहितीवरून भरारी पथकाने नाशिक औरंगाबाद मार्गावरील लाखलगाव चौफुली येथे नाकाबंदी केली असता आनंद पद्मनाभ शेट्टी हा संशयीत बेकायदा मद्याची वाहतूक करीत असतांना मिळून आला.

संशयीताच्या ताब्यातील मारूती अल्टो (एमएच 15 एचएच 9248) कारमध्ये विविध कंपन्यांचा देशी- विदेशी मद्याचा साठा मिळून आला. संशयीतास अटक करीत पथकाने कारसह मद्यसाठा असा सुमारे 1 लाख 8 हजार 420 रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ व जिल्हा अधिक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक प्रविण मंडलिक,अरूण सुत्रावे जवान विलास कुवर,सुनिल पाटील,श्याम पानसरे,धनराज पवार अनिता भांड आदींच्या पथकाने केली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!