Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

घोटी : टँकर मंजूर असूनही रस्ता नसल्याने महिलांची पाण्यासाठी पायपीट

Share

घोटी : इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या जवळपास असलेल्या आवारवाडी या दुर्गम भागात प्रशासनाने टँकर मंजूर केला. मात्र वाडीला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने आवार वाड़ीत पाण्याचा टँकर जात नाही. त्यामुळे येथील महिलांना टँकर मंजूर असूनही चार ते पाच किमी अंतरावरून पाण्यासाठी पायपिट करावी लागते.

अत्यंत दुर्गम परिसर असलेला आवारवाडी ही मानवेढे ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आहे. मात्र या वाडीला रस्त्यामुळे टँकर जात नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. टंचाईच्या शेवटच्या टप्प्यात डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात व तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

घोटी : इगतपूरी तालुक्यातील अतिशय डोंगराळ व दुर्गम भाग् असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतिल आंबेवाडी शिवारातील ठाकुरवाड़ी, काननवाडी या भागात पाण्याच्या टाकया भेट देण्यात आल्या. टंचाइग्रस्त गावे असल्याने पाण्याचा अपव्यय होउ नये व शुद्ध पाणी ग्रामस्थाना मिळावे यासाठी मनसेच्या पदाधिका-यांनी हा उपक्रम राबविला.

सह्याद्रीच्या कुशीत व कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या व विकासापासुन दुर्लक्षित असलेल्या वाडया पाडयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या परिसरातील आदिवासी बांधवाना मदत करण्याचा प्रयत्न केला. नाशिकचे माजी महापौर तथा मनसेचे नेते अशोक मूर्तडक यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील कळसुबाई शिखर, आलंग गड , मदनगड, कुलंग गड यांच्या पायथ्याशी असलेल्या आंबेवाडी गावाजवळील काननवाडी,

ठाकुरवाडी, या दुर्लक्षित वाडयामध्ये मनसेचे पदाधिकारी जाऊन तेथील आदिवासी बांधवाना पाण्याच्या टाकी भेट देण्यात आल्या व महिलांना साडी वाटप करण्यात आल्या, पुरुष मंडळीला शाल तसेच बाळगोपाळाना चिवडा, बीस्कीटचे पॉकेट वाटप करण्यात आले.

तसेच स्थानिक तालुका प्रशासनाशी लवकरच संपर्क साधुन पाण्याचे टँकर चालू करण्यात येईल. ह्या उपक्रमात महाराष्ट्रनवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष रतनकुमार इचम, अंनत सूर्यवंशी, जिल्हा संघटक भगिरथ मराडे, सुशील गायकरआदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!