Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरीत काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता; आमदार गावित भाजपच्या वाटेवर ?

Share

नाशिक : आगमी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या मतदारसंघात खिंडार पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये पडझड होण्यास सुरुवात झाली आहे.

इगतपुरी विधानसभा मतदारसंघ गेल्या दोन पंचवार्षिक काँग्रेसच्या ताब्यात असून या ठिकाणी विद्यमान आमदार निर्मला गावित यांचे वर्चस्व आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणूका लागणार असून त्या अनुषंगाने या मतदासंघात विद्यमान सरकारच्या हालचाली वाढत आहेत.

त्यामुळे आमदार गावित या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. परिणामी गत दोन पंचवार्षिक सांभाळणाऱ्या काँग्रेसला बालेकिल्ला गमावण्याची वेळ येते कि काय ? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

राज्यातील काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली असून, ते भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!