Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : शेनवड येथे फटाक्यांमुळे दोन बालक जखमी

Share

नाशिक। दिवाळीत फटाके फोडताना भाजल्याने ५ व ६ वर्षाचे दोन बालक जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.२९) दुपारी इगतपुरी तालुक्यातील शेनवड येथे घडली.

रोशन पांडू कातोरे (५) व संदिप रावजी कडके (६, रा. दोघेही शेनवड, ता. ईगतपूरी) अशी जखमी झालेल्या बालकांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळी निमित्त राहत्या घरासमोर रोशन व संदिप फटाके फोडत होते.

दोघेही फटाक्याजवळ बसून जवळून फटाका पेटवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक फटाक्यातून जाळ उडाल्याने दोघांचे चेहरे तसेच हातास भाजले आहे. त्यांना त्यांच्या वडिलांनी घोटी प्राथमिक आरोग्य केंद्र व पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!