Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी-त्र्यंबकमध्ये कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना सरळ लढत; खोसकरांच्या उमेदवारीने गावितांना आव्हान

Share

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे हिरामण खोसकर यांना इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे.

दरम्यान नुकताच हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्याकडे दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा राजीनामा दिला आहे. काल (दि. ०१) काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यावेळी इगतपुरी -त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून खोसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

खोसकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले होते. पक्षांतर बंदीच्या कायद्यात अडकू नये,यासाठी खोसकर यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा हा राजीनामा अध्यक्ष शीतल सांगळे यांनी स्वीकारला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!