Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी महामार्गा जवळील कम्फर्ट इन हॉटेलमध्ये युवतीवर अत्याचार

Share

इगतपुरी । प्रतिनिधी

शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या हॉटेल कम्फर्ट इन येथे एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

इगतपुरी शहरातील चेतन घायवट रा. आंबेडकर नगर, याचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर ४ ते ५ वर्षांपासून प्रेम संबंध असताना, त्याने या तरूणीला १७ डिसेंबर २०१८ ला तळेगाव शिवारातील कम्फर्ट इन हॉटेलमध्ये बळजबरीने बोलवून अत्याचार केला. पिडीत युवती घाबरल्याने त्याने तिला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर वेळोवेळी हॉटेल मध्ये बोलवून अत्याचार केले.

दरम्यान, दोघांचा साखरपुडा कुटुंबियांच्या सहमतीने १७ फेब्रुवारी २०१९ ला करण्यात आला. त्यानंतर संशयित चेतनने लग्नाच्या मोठया अटी शर्ती ठेवत लग्न करण्यास टाळाटाळ केली. आता माझा तुझा काही संबंध नाही असे सांगून तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांना दमदाटी केली. आपल्यावर अत्याचार झाल्याची जाणीव झाल्यानंतर तरुणीने व कुटुंबियांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हॉटेल व्यवसायाच्या नावाने अवैध धंदे
इगतपुरी शहर व परिसरातील महामार्गावर अनेक छोटी मोठी हॉटेल, लॉज असून यात सर्रासपणे तरुण तरुणी यांना अवैध रित्या प्रवेश दिला जात असल्याने असे प्रकार होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. हॉटेल व्यवसायिकांनी नियमांचे पालन करून व्यवसाय केल्यास असे प्रकार घडणार नाहीत. मात्र जास्त मोबदल्यात चौकशी न करता सर्रासपणे रूम भाड्याने दिले जातात. या प्रकरणामुळे तरी लॉज व हॉटेल व्यवसायिक धडा घेतील का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!