Video : शिवसेना महिला आघाडीचा मंगळागौरीचा जागर कार्यक्रम संपन्न

0

इगतपुरी : शहरातील शिवसेना महिला आघाडीचा भव्य मंगळागौरीचा जागर कार्यक्रम शुक्रवारी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राखी मुथा, सीमाताई इंदुलकर, चारुशीला इंदुलकर, तालुका महिला प्रमुख अलका चौधरी, शहर प्रमुख जयश्री जाधव, उपशहर प्रमुख सायली शिंदे, शीतल चव्हाण, विधानसभा संघटक परिणीता मेस्त्री, जयश्री शिंदे, आशा गांगुर्डे आदी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात गणपती ईशस्तवनाने करण्यात आली. यावेळी मंगळा गौरी जागरमध्ये शिवसेनेच्या वतीने प्रथमच महिलांसाठी खुले व्यासपीठ झाल्याने महिलांमध्ये आनंदी वातावरण दिसून आले. यात झिम्मा फुगडी, अगोटे पागोटे, एक हाताची फुगडी, दंड फुगडी, त्रिकुट फुगडी, चौकट फुगडी, असरट पसरट केळीचे पान, झिम्मा, भोवर भेंडी, अडगळ गुम पडगळ गुम, अशा विविध पौराणिक मंगळा गौरीच्या खेळांनी उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले होते. यावेळी शेकडो महिला उपस्थित होत्या.

यावेळी नगरसेविका उज्वला जगदाळे, मीनाताई खातळे, रोशनी परदेशी, आशाताई सोनवणे, आरती कर्पे, गीता मेंगाळ, महिला आघाडी पदाधिकारी सरोज राठी, सुनीता गोफणे, चारुशीला आराईकर, सुरेख मदगे आदींसह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

*