Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी तालुक्यातील बैलांची चोरी करणारी टोळी रंगेहात पकडली

Share

घोटी : इगतपुरी तालुक्यातील सातुर्ली येथील एका आदिवासीं शेतक-यांची बैलजोडी आज मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. मात्र बैलजोड़ी चोरुन नेताना काही अंतरावर चोरट्यांचे वाहन बंद पडल्याने परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच चोरटे अलगद नागरिकांच्या हाती लागले. घोटी पोलिसांनी शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन दोघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या परिसरातून यापुर्वीही अनेक शेतकऱ्यांच्या बैलांची चो-या झाल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. मात्र हे चोरटे हाती लागल्याने बैलचोरीच्या आणखी काही चो-या उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

याबाबत वृत्त असे की इगतपुरी तालुक्यातील सातुर्ली येथील शेतकरी यशवंत बुधा शेंडे यांची अंदाजे ८० हजार रुपये किमतीची बैलजोडी आज मंगळवार रोजी पहाटेच्या दरम्यान गोठयातून अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली.

दरम्यान बैलचोरीच्या गुन्ह्यात चोरट्यांनी वापरलेली पिकअप जीप एम एच -१४/ ए जी- ४७२७ ही काही अंतरावरच बंद पडली. या गाडीतील युवकांच्या संशयास्पद हालचाली व जीपमध्ये बैलजोडी दिसल्याने नागरिकांना संशय आल्याने त्यांनी या बैलचोरट्यांना ताब्यात घेउन घोटी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

घोटी पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन दोघे बैलचोरटे, पिकअप वाहन व चोरुन घेयून जात असलेली जवळपास अंदाजे ८० हजार रुपये किमतीची बैलजोडी पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणी यशवंत बुधा शेंडे रा सातुर्ली यांच्या फ़िर्यादीनुसार घोटी पोलिसांनी संशयित अरशद अन्सार शेख वय २९ व वसीम लतीफ शेख वय २४ दोघेही रा कुरण ता संगमनेर यांच्याविरुद्ध कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास सहायक निरीक्षक आशीष अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुहास गोसावी, शीतल गायकवाड, पाटील आदि करीत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!