Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी येथील दुर्लक्षित असलेला तामकडा धबधबा

Share

कवडदरा । भाऊराव रोंगटे :
शहराजवळील निसर्ग पर्यटन म्हटले कि जिल्ह्यातील इगतपुरी-ञ्यंबकेश्वर या शहरांची आठवण होते. दरम्यान इगतपुरी येथील टाकेद जवळील तामकडा धबधबा पर्यटकांच लक्ष वेधून घेत आहे.

दरवर्षी पावसाळा सुरु झाला की हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात. इथे असणाऱ्या विविध प्रकारच्या धबधबे पर्यटकांना आपलंस करतात. तामकडा धबधबा हा टाकेद जवळील मायदरा गावापासुन जवळजवळ एक कि.मी.पायी जात निसर्गरम्य झाडाझुडपातुन वाट काढत पर्यटकांच्या नजरेस पडतो. साधारण ५० ते ६० फुटावरुन कोसळणारा धबधबा पर्यटकांना सुखावह वाटतो. अनेक पर्यटक शनिवार व रविवार सुट्टीत या ठिकाणी येतात. परंतु अनेकांना या धबधब्याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने अजूनही तांमकडा धबधबा दुर्लक्षित आहे.

या ठिकाणी जाण्यासाठी सर्वतिर्थ टाकेद-शिरेवाडी-मायदरा असे ३ कि.मी. चे अंतर आहे. रस्ता अरुंद असल्याने वाहनासाठी सुरक्षित नाही. काही ठिकाणी रस्ता खचलेला आहे. त्यामुळे पर्यटन विभागाने याकडे लक्ष देवुन धबधब्यापर्यंत रस्त्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

गेल्या अनेक वर्षापासुन अनेकांची मने जिंकणा-या तामकडा धबधब्याकडे पर्यटक नेहमी येतात. परिसरातून सात आठ किलोमीटर अंतरावरून दिसणारा हा धबधबा पर्यटकांना दुरूनच आकर्षित करतो. प्रत्येक्षात खूपच मनमोहक असून निसर्गाच्या सानिध्यात आनंद मिळतो .
-हरीदास लोहकरे (जि.प.सदस्य नाशिक)

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!