Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : कसारा घाटात साबुदाण्याचा ट्रक उलटला; चालक जखमी

Share

इगतपुरी : कसारा घाटात दुपारी दीड वाजेच्या सुमारास साबुदान्यांनी भरलेल्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ५०० फूट दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्यास महामार्ग वाहतूक शाखेच्या ( घोटी-टॅप ) पोलिस कर्मचाऱ्यांनी १०८ क्र. च्या रुग्णवाहिकेतून इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान नाशिककडुन मुंबईकडे जाणारा MH. 20 AT 9880 हा ट्रक दुपारी नवीन http://कसारा घाटातूनजात असतांना हा अपघात घडला. ट्रकचेब्रेक फेल झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक सरळ ५०० फुट खोल दरीत कोसळला.

मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात अपघातांची मालिका सुरुच असून कसारा घाटातून जाताना व जुन्या घाटातून येतांना अनेक अपघात होत आहेत. दि. ३ नोव्हेंबर रोजी एका लोखंडी सळई भरलेल्या कंंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने या कंटेनरने सलग १० ते १२ वाहनांना धडक दिली होती. त्यात कित्येक वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. तर कित्येक जण गंभीर जखमी झाले होते.

या अपघातामुळे सलग तीन दिवस वाहतुक ठप्प झाल्याने सर्व प्रवाशांना व वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. रोजच एक दोन वाहनांचे ब्रेक फेल होतांना दिसत आहे. ४ दिवसा पुर्वी एस.टी बसचे ब्रेक फेल झाले होते, त्यावेळी ३५ प्रवाशांचे प्राण वाचले होते.

दरम्यान या अपघातग्रस्त ट्रक चालकास ५०० फुट खोल दरीतुन सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी महामार्ग वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल वालझडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गांगुर्डे, माधव पवार, मोतीराम सावकार, केतन कापसे, अक्षय नाठे, किरण आहेर यांनी शर्तीचे प्रयत्न करुन गंभीर जखमी चालकास बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!