Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरीत पावसाची विश्रांतीमुळे पर्यटकांच्या गर्दीत वाढ

Share
इगतपुरी । प्रतिनिधी
सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्या, धरणांचा राजा, सर्वाधिक पाऊस अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी परिसराला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. त्यामुळे या भागात पर्यटनाचा आंनद लुटण्यासाठी हजारो पर्यटकांची गर्दी या ठिकाणी असते.स्वातंत्र्य दिनासह सलग सुट्टयामुळे इगतपुरी परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी जय्यत तयारी केली आहे.
इगतपुरीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली असुन सध्या केवळ श्रावणसरीचा वर्षाव सुरु आहे. त्यामुळे धरणात होणारी पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात रोडावल्याने विसर्गातही कपात करण्यात आली आहे. सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरु झाल्याने पर्यटकांची संख्याही लक्षणीय वाढली आहे.
पावसाळ्याचे दोन तीन महिने धोs धो कोसळणारा पाऊस आणि त्यानंतर श्रावणसरीचा शिडकाव, घनदाट झाडी, कसारा घाटातील वळणदार रस्ते, मध्य रेल्वेच्या कसारा घाटातील बोगद्यातुन मार्गक्रमण करणारी रेल्वे यामुळे स्वर्गीय आंनद देणारा विस्तृत जलाशय, पावसाळ्यात वारंवार धुक्यात हरवणारा कसारा घाट रस्ता, हिरवाईने नटलेली सह्माद्रीची डोंगर रांग अशा वेगवेगळ्या कारणांनी हा परिसर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत असतो.
१५ ऑगष्टच्या पार्श्वभुमीवर इगतपुरीत केवळ नाशिक, धुळ्याहुनच नव्हेतर मुंबई, ठाणे, पुणे आदी भागातुन मोठया प्रमाणात पर्यटक दाखल होत असतात. पर्यटकांसोबत मद्यपीचेही पाय या भागाकडे खेचले जात असल्याने त्यांच्या धांगडधिग्यामुळे पर्यटकांना त्रास होऊ नये म्हणुन गेल्या दोन महिण्यापासुन इगतपुरी पोलीस अधिक सर्तक झाले असुन भावली धरणाकडे व धबधब्याकडे जाणाऱ्या पिंप्रीफाट्यावरच कडक बंदोबस्त ठेऊन पर्यटकांच्या वाहनांची कसुन तपासणी केली जात आहे. या विशेष पथकात पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे, AS| संदीप शिंदे, पोलीस हवालदार विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले, मुकेश महिरे, आदींनी करडी नजर ठेऊन आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक आरती सिंग यांनी आदेश काढले असुन मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 ( 1 ) ब नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत बुधवार ( दि.१४ ) मध्यरात्रीपासुन ते शुक्रवार ( दि.१६ ) पर्यंत इगतपुरी परिक्षेत्रात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे.मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या कसारा घाटात पोलीसांची फिरती पथके नेमण्यात आली असुन रस्त्यावर वाहने उभी करुन धांगडधिंगा करणाऱ्या मद्यपीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.
शहर परिसरात पर्यटनाचा आंनद लुटण्यासाठी बाहेर गावांहुन हजारो पर्यटकांची उपस्थिती येथे असते.त्यात सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सर्वच पर्यटनस्थळी पोलीसांचा चोख बंन्दोबस्त ठेवला आहे.सेल्फीच्या नादात खोल पाण्यात किंवा टेकरीवर कोणी पर्यटक जाऊ नये म्हणून पोलीसांची करडी नजर आहे.मद्यपी आढळल्यास त्यास पर्यटनस्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
– अशोक रत्नपारखी, पोलीस निरीक्षक, इगतपुरी.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!