Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा; राज्यराणीला उशीर होणार

Share

नाशिक : मध्य रेल्वेच्या इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास रेल्वे रूळाला तडा गेल्याने रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. मनमाडहुन मुंबईकडे जाणारी राज्यराणी एक्सप्रेस प्लेटफार्म नंबर तीन वर आली असता हि घटना घडली.

ही बाब रेल्वे कर्मचारी यांच्या लक्षात येताच मुंबईकडे जाणारी मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस व इतर एक्सप्रेस प्लेटफार्म नंबर चार वरुन वळविण्यात आल्या. यामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परीणाम झाला नाही.

दरम्यान राज्यराणी एक्सप्रेस प्लेटफार्म तीन वर अडकली होती. यावेळी आपत्कालीन विभागाच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेत तातडीने रुळाला तात्पुरता जॉइंड देऊन राज्यराणी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आली. या घटनेमुळे राज्यराणी एक्सप्रेसला मुंबईला जाण्यासाठी अर्धा ते पाऊणतास उशिर झाला.

मध्य रेल्वेकडून तडा गेलेल्या रूळाचे काम पूर्ण करण्यास, हे रूळ बदलण्यास अद्याप दीड ते 2 तासांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे नाशिक मार्गावरून धावणार्‍या मध्य रेल्वेच्या राज्यराणी आणि पंचवटी एक्सप्रेसला उशिर होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एवढी मोठी घटना झाली असता इगतपुरीचे स्टेशन मास्टर प्रेमचंद आर्या व मोठे अधिकारी अनुपस्थीत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!