Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नवरात्री २०१९ : नवसाला पावणारी इगतपुरीची घाटनदेवी माता

Share

इगतपुरी । विविध पंथीय साधु- संतांच्या पदस्पर्शाने व ऐतिहासिक वास्तुने इगतपुरी तालुका पावन झाला आहे. त्याचबरोबर प्रातःस्मरणीय घाटनदेवीच्या सानिध्यामुळे तर त्या पावित्र्यात अधिकच भर पडली आहे. मुंबई आग्रा महामागावर नाशिक मार्गे मुंबईकडे जातांना अत्यंत नागमोडी वळणाचा कसारा घाट आहे. नाशिक जिल्हयाचे प्रवेशव्दार समजल्या जाणाऱ्या इगतपुरीच्या परिसरात प्रवेश करतांनाच थळ घाटाच्या पायथ्याशी शिवकालीन काळापासुन प्राचीन असे देवीचे मंदीर आहे. घाटात देवीचे स्थान असल्यामुळे घाटनदेवी असे म्हणुन ते सुप्रसिद्ध झाले आहे.

घाटनदेवीचे रूप अत्यंत विराट असुन संकटसमयी भक्तांच्या मदतीला धावणारी व नवसाला पावणारी म्हणुन घाटनदेवीचा महीमा आहे. घाटनदेवी मातेचा श्रीदुर्गा सप्तशतीमध्ये शैलपुत्री, ब्रम्हाचारीणी, चंद्रघाटा, कृष्णाडा, स्कंदमाता, कात्यायानी, कालरात्री, महागिरी, महासिध्दी, महागौरी, व रिद्धी – सिद्धी असे विवध रुपे आहेत. यातील पहीले रुप म्हणजे शैलपुत्री म्हणजेच घाटनदेवी माता होय, प्राचीन माहीतीनुसार देवी वजरेश्वरीहुन भीमाशंकरकडे येण्यास निघाली त्यावेळेस रस्त्यात देवीने या ठिकाणी विश्रांती घेतली व ती येथेच स्थिर झाली तीच ही घाटनदेवी होय. शैलाधिराज तनया म्हुणुनही या देवीची मोठी ओळख आहे.

वजरेश्वरीहुन भीमाशंकरकडे प्रयाण करीत असतांना देवी येथे विश्रांती साठी थांबली अशी प्राचीन माहीती असली तरी आजही तीच खरी आहे असे येथे आल्यावर वाटते. नैसर्गिक वातावरण आणि सुंदर पारिसराने मोहीत होऊन देवीने येथे मुक्काम ठोकला अशी पुरातन कथा आहे. या मंदिरासमोरच उंटदरी नावाचे सृष्टीसौदंर्याने नटलेले ऐतिहासिक स्थान असुन छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणचा खजिना लुटुन उंट याच दरीत लोटले होते. यामुळे या दरीला उंटदरी असे नाव पडले आहे त्याचा अपभ्रंश उंटदरी असा झाल्याचे इतितासात नमूद आहे.

कोणताही सह्रदयी माणुस या ठिकाणी आल्याबरोबर अगोदर सृष्टीसौंदर्याकडे लक्ष देतो विशेषता मुंबईकडे आणि नाशिककडे ये- जा करणारे वाहनातील प्रवाशी तर इतके भारावतात की , त्यांना सौंदर्यक्षण टिपुन घेण्याचा मोहच आवरता येत नाही.

जव्हारकडुन पुण्याकडे मावळ प्रातांत जाणारा अतिदुर्गम रस्ता याच उंटदरीतुन होता तसेच भातसा नदीचा उगम याच दरीतुन झाला आहे. उंटदरीपासुन जवळच असणाऱ्या घाटनदेवी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज कल्याण मार्गे थळ घाटात आले होते. या काळात शिवाजी महाराज यांनी आपल्या मावळयांसह घाटनदेवीची यथासांग व शास्त्रोक्त पुजा अर्चा करून देवीचे दर्शन घेतले असल्याची नोंद इतिहासात नमूद आहे.

देवीचे लोभस आणि तेजस्वी रुप आजही भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रस्थानी आहे. वाघावर रूढ असलेली घाटनदेवी माता भक्तांना प्रसन्न मुद्रेने आशिर्वाद देऊन पुढील प्रवास सुखाचा होवो याचे वरदान देते. म्हणुनच मंदीराच्या आसपास आजपावेतो कुठलाही आघात वा अपघात घडला नाही आणि गावावरही विशेब संकट आले नाही अशी स्थानिकांची धारणा आहे.

नवरात्र उत्सवात या ठिकाणी नऊ दिवस यात्रा भरते यासाठी राज्याच्या विविध भागातुन भाविक दाखल होतात येथे भाविकांची पहाटे पाच पासुन ते रात्री दहा पर्यतं दर्शनासाठी गर्दी होत असते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!