Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी तालुक्यातील सांजेगांव येथे बिबट्या जेरबंद

Share

इगतपुरी । तालुक्यातील सांजेगांव येथे गेले चार पाच महिन्यांपासून बिबट्याचा संचार सुरु आहे. या बिबट्यानी परिसरात मोठय़ा प्रमाणावर दहशत निर्माण केली होती. दरम्यान वनविभागाने पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी मान्य करत नुकताच पिंजरा लावला होता. यात सांजेगाव येथे गावानजीकच पहाटेच एक बिबट्या जेरबंद झाला आहे.

सांजेगावासह परिसरातील आहुर्ली, नांदडगाव, कुशेगाव, मोडाळा, शिरसाटे, वांजोळे, शेवगेडांग आदी दहा बारा गावामध्ये गेल्या चार पाच महिन्यांपासून बिबट्याची हजेरी आढळत आहे. या बाबत परिसरात जोरदार चर्चा सुरू होती. दरम्यान यात सदरील बिबट्यानी मळा, शेती वस्तीवरील अनेक शेतकर्‍यांच्या शेळ्या, मेंढ्या, वासरू, कुत्रे आदीसह विविध जनावरांचाही फडशा पाडल्याचे ठिक ठिकाणी आढळून आले. यामुळे परिसरात सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले होते. रात्री बेरात्री घराबाहेर पडणे नागरिकांना मुश्किल झाले होते.

दरम्यान नागरिकाचीं सुरक्षितता व मोठ्या प्रमाणात मागणीचा रेटा लक्षात घेता पिंजरा लावण्याची करणेत आलेली मागणी वनविभागाने मान्य केली होती. त्या नुसार वनविभागाने सांजेगाव येथे पिंजरा लावला होता. पिंजरा लावल्यानंतर हा बिबट्या वाघ सापळ्यात अडकून आज पहाटे जेरबंद झाला आहे.

दरम्यान परिसरात अद्यापही दोन ते तीन पट्टेरी वाघ फिरत असुन वेळोवेळी ते नागरिकांना आढळून आले असल्याचा दावा यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना नागरिकांनी केला आहे. तर वनविभागाने मात्र पट्टेरी वाघ नसुन बिबट्या, तरस आदी वन्य प्राणी असल्याचे नमुद केले आहे. लवकरच उर्वरित बिबटेही जेरबंद करण्यासाठी कार्यवाही करु अशी ग्वाही वनविभागाने यावेळी बोलतानां दिली आहे.

दरम्यान बिबट्या जेरबंद करणेसाठी वनपरिक्षेत्र आधिकारी रमेश डोमसे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ आधिकारी शैलेश झुटे, बी. जी. राव, वनरक्षक श्रीमती पवार, श्रीमती साबळे, वाहनचालक मुज्जुभाई आदींनी परिश्रम घेतले आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!