Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सांजेगाव येथे पुन्हा एकदा बिबट्याची दहशत; वासरावर केला हल्ला

Share

आहुर्ली : सांजेगाव ता ईगतपुरी येथे वनविभागाने सापळा लावून एक बिबट्या जेरबंद करण्याच्या घटनेस अद्याप महिनाही उलटला नसुन पुन्हा एकदा बिबट्याची दहशत सुरू झाली आहे.

सांजेगावातील बाळु काळे या शेतकऱ्यांच्या वासरावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. सुदैवाने वासराच्या आरडाओरडीने काळे कुटुंबातील लोक झटपट जागी झाल्यावर तातडीने त्यांनी हल्ला गुल्ला केला. यामुळे बिबट्या तेथून पसार झाला.

विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी वनविभागाने सापळा लावून पकडलेला बिबट्या ही बाळु काळे याच शेतकऱ्यांच्या घराजवळ जेरबंद करण्यात आला होता.

दरम्यान या मुळे पुन्हा एकदा परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने याची तातडीने दखल घेवुन बंदोबस्त करावा अशी मागणी सांजेगाव व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!