Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : शेनवड येथे सलग तीन दिवसापासून बिबट्याचा हल्ला

Share

इगतपुरी । तालुक्यातील शेनवड खुर्द व कृष्णनगर परिसरात बिबटयाचा वावर असून गेल्या तीन दिवसापासुन पाळीव प्राण्यांची शिकार केली जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

शेनवड खुर्द येथील गणेश अंबादास कुंदे यांच्या राहत्या घराजवळ गोठ्यात सलग तीन दिवसापासून रात्रीच्या सुमारास बिबट्याने कोंबड्या, म्हशीचे पारडू आणि आज शेळीवर हल्ला करून फस्त केले आहे.

त्यामुळे गावात व वस्तीवर भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी यांनी वनरक्षक घाटेसाव यांना भ्रमणध्वनीवरून सदर घटनेची माहिती दिली. वनविभागाने मृत शेळीचा पंचनामा करण्यात आला असुन तीन दिवसापूर्वी नेलेल्या पारडाची कवटी सापडली आहे. पंचनाम्याच्या वेळेस साखराबाई कुंदे, अंबादास कुंदे, दशरथ बेंडकोळी, काशिनाथ घोडे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सलग तीन दिवसापासून हा बिबट्या शेतकऱ्याचे नुकसान करीत असून परिसरात भीतीचे वातावरण परिसरात पसरले आहे. शेतकऱ्याला योग्य ती भरपाई करुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी पीडित शेतकरी व परिसरातील लोकांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!