Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : अपहरण झालेल्या मुलीची रेल्वे पोलिसांकडून सुटका

Share

इगतपुरी । प्रतिनिधी
दिनांक १२ रोजी मुंबई बांद्रा येथील रहिवासी मुलगी चेतना नरेश बागोरिया वय १६ वर्ष ही सायंकाळी चार वाजता इगतपुरी रेल्वे स्थानकात मुंबईहुन येणाऱ्या मंगला एक्सप्रेसमध्ये प्रवास करीत होती. यावेळी इगतपुरी लोहमार्ग पोलीस गस्त करीत होते.

मंगला एक्सप्रेसमध्ये गाडी तपासनी करतांना ऑन ड्युटी टीकीट तपासणीस यांच्या निदर्शनात ही प्रवासी मुलगी आढळुन आली. सदर मुलगी विना तिकीट प्रवास करीत असल्याने तीला विचारणा करताचं सर्व प्रकार उघड झाला तेव्हा लोहमार्ग पोलीसांना टि सीने माहिती दिली की एक मुलगी एकटीच प्रवास करत असून बराच वेळापासून रडत आहे व तिच्याकडे प्रवासा करीता तिकीट वैगरे नाही.

या माहीती वरून ASI शिवाजी इघे, पोलीस नाईक संजीव पारधी, पोलीस कॉन्स्टेबल सतीश खार्डे, रेल्वे लेखा विभाग कर्मचारी आनंद शिंदे यांनी सदर मुलीस रेल्वे गाडी मधून उतरून घेऊन चौकशी केली. यावेळी तीच्या आजुबाजुला असलेल्यांनी पोलीसांची चाहुल लागताचं काढता पाय घेतला. मुलीकडे चौकशी असता तिचे मुंबई येथून अपहरण झाल्याचे कळाले.

सदर प्रकार गंभीर असल्याने ASI शिवाजी इघे यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपास केला असता सदर मुलीचे पालकांनी निर्मल नगर पोलीस ठाणे खार, पूर्व मुंबई येथील पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 284/19 कलम 363 भा. दं. वि प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे कळाले.

सदर मुलगी बाबत निर्मल नगर पोलीस ठाणे येथे माहिती देऊन अपहरण झालेल्या मुलीस निर्मल नगर पोलीस ठाणे येथील कर्मचारी व अपहरण झालेल्या मुलीची बहीण व भाऊ यांचे ताब्यात इगतपुरी लोहमार्ग पोलीस आधिकारींनी चेतनाला सुखरूप तीच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी इगतपुरी लोहमार्ग सहायक पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, पोलीस नाईक शिवाजी इघे, पोलीस हवालदार सतिश खार्डे आदी उपस्थीत होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!