Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : बोरटेंभे दरोड्यातील जखमी महिलेचा मृत्यू

Share

इगतपुरी । तालुक्यातील बोरटेंभे शिवार येथे बुधवारी (दि.2) मध्यरात्री चोरट्यांनी तीन ठिकाणी दरोडा टाकला होता. यात ताईबाई आडोळे (वय 40) या गंभीर मारहाण झालेल्या महिलेचा नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी (दि. 3) दुपारी मृत्यू झाला.

यावेळी संतप्त ग्रामस्थ व महिलांनी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, पोलीस उपअधीक्षक अरुंधती राणे, पोलीस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांना आरोपींना लवकरात-लवकर अटक करून कठोर कारवाईचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.

पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालयाला पत्र देऊन बोरटेंभे गावात वीज व्यवस्था करण्यास सांगितले. नागरिकांनी बाहेरील येणार्‍या अनोळखी फेरीवाल्यांना गावात येऊ देऊ नये, अशा सूचना दिल्या.

यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी गुन्हे शाखेचे पोलीस नवनाथ गुरूळे, संदीप हांडगे, पोलीस सेवक विनोद गोसावी, सचिन देसले, कल्पना जगताप, शिवाजी लोहरे, संदीप शिंदे आदी पोलीस ताफा उपस्थित होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!