Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : कार अपघातात एक जण गंभीर जखमी

Share

इगतपुरी । नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या चारचाकी गाडीचा मुंढेगाव जवळ अपघात झाला असून या अपघात चालक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकहून मारुती सुझुकी कंपनीची (MH 43 AR 8368) ही चारचाकी गाडी मुंबईच्या दिशेने जात असतांना (दि. १८) रोजी सकाळी साडे नऊच्या दरम्यान चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे.

या अपघातात चालक प्रदीप रावजी पटेल (वय ३६) रा मुंबई हा गंभीर जखमी झाला असून यावेळी नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी जखमीला उपचारासाठी नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी घोटी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!