Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी तालुक्यातील शेणवड खुर्द गावातील महिलांचा तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा

Share

इगतपुरी । प्रतिनिधी
तालुक्यातील शेणवड खुर्द गावात तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत असुन या गावातील महीलांनी एकत्र येत माजी सरपंच मीरा हेमंत झोले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढुन कृत्रिम पाणी टंचाईला जबाबदार असणारे सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात निवासी नायब तहसीलदार चरण दोंदे यांना निवेदन दिले. यावेळी महीलांनी संताप व्यक्त करीत तीव्र घोषणाबाजी केली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गावात तीव्र पाणी टंचाई भासत असुन महीला वर्गाला पहाटे पासुनच पाणी भरण्यासाठी हातपंपावर जावे लागत असुन पुर्ण दिवस हंडाहंडा पाणी भरण्यातच जात आहे. त्यामुळे उपजिवेकेसाठी कामधंद्याला सुध्दा जाता येत नाही. गावची पाणी पुरवठा नळ योजना सुरळीत करण्यास गावचे सरपंच व ग्रामसेवक कामचुकार पणा करत असुन गावातील स्टँड पोस्ट देखील गायब करून त्याच्यात अफरातफर केल्याची दाट शक्यता आहे. पाणी न देता ग्रामपंचायत नागरिकांकडून दमदाटीने पाणी पट्टी वसुल करत असुन नियोजना अभावी जनतेला वेठीस धरले जात आहे. सदर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करून गावाचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, तसेच ग्रामपंचायतीची सखोल चौकशी करण्यात यावी. न्याय न मिळाल्यास आपल्या कार्यालयासमोर भव्य आंदोलन छेडण्याचा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला.

यावेळी माजी सरपंच मिरा झोले, सविता भारमल, मीरा कुंदे, पुष्पा गवारी, अलका पावडे, ज्योती झोले, अर्चना आंबवणे, भिकुबाई दराणे, जिजाबाई खेताडे, झुंबराबाई आंबवणे, शोभा गवारी, पार्वता वारघडे, पुजा झोले, सुनिता दराणे, मीना खेताडे, नंदा धादवड, वंदना आंबवणे, सरला घुटे, हेमंत झोले, हरीष कुंदे, अरुण वारघडे, संतोष मराडे, पोपट भारमल, किरण वारघडे, किसन दराणे, शिवा बांगर, प्रकाश गवारी, रोहीदास बांगर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!