टाकेद खुर्द येथे विजेचा शॉक लागुन बैल जागीच ठार

0
इगतपुरी | तालुक्याच्या पुर्व भागातील टाकेद खुर्द येथील शेतकरी भाऊराव नाना शिंदे हे शनिवार ( ता.१ ) रोजी दुपारी चारच्या सुमारास तातळेवाडी रस्त्यालगत असलेल्या त्यांच्या शेतावर बैल चारत होते. बैल चारत असतांना त्यातील एका बैलाचा पाय येथील ११ के व्ही एल टी विद्युत लाईनच्या खांबाला असलेल्या स्टे वायरला बैलाचा पाय अडकल्याक्षणी बैल जागीच ठार झाला.
त्याचवेळी शेतकरी भाऊराव शिंदे हे त्यांच्या बैलाला वाचविण्यासाठी बैलाला ढकलण्यासाठी गेले असता त्यांनाही विजेचा धक्का लागला मात्र सुदैवाने शेतकरी भाऊराव शिंदे यांचे प्राण वाचले. मुलगा खंडेराव शिंदे यांनी घडलेला सर्व प्रकार तात्काळ येथील वायरमन व्ही. आर. बोडके यांना सांगीतला असता लगेचच बोडके यांनी ही बाब घोटी ग्रामिण कक्ष अधिकारी राणे यांना तात्काळ कळवुन घटनास्थळी धाव घेतली. लगेचच येथुन जाणारी ११ के व्हि एल टी लाईन बंद केली व ठार झालेल्या बैलाची पाहणी केली.
येथील पशुवैद्यकिय अधिकारी व डॉ. टोचे यांना घटनास्थळी बोलावुन मृत बैलाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत बैलाचा पंचनामा करण्यात आला. शवविच्छेद रिपोर्टनुसार विजेचा शॉक लागुणच बैलाचा मृत्यु झाला. हे उघडकिस आले असता लगेचच वायरमन श्री.बोडके यांनी  येथिल एल टी विद्युत लाईनची पेट्रोलिंग करुन येथील अकरा के व्ही वर असलेल्या थ्रीफेज वाढिव दाब वाहीनीच्या तारेचा करंट  खाबांच्या स्टे वायरवरती उतरल्यामुळे बैलाचा विजेचा शॉक लागुन मृत्यु झाला असा जबाब म.रा.वि.वि.कं.मर्या विद्युत निरिक्षक कार्यालय नाशिक यांनी प्रत्यक्ष विचारल्यावरती सदर खरा जबाब श्री.बोडके यांनी लिहुन दिला.
त्यानंतर सदर ११ kv लाईन बंद करुण स्टे व लघुलाईन मधिल अंतर वाढवुन लाईन चालु करण्यात आली. यावेळी घटनास्थळी येथील सरपंच सत्यभामा बांबळे, साहेबराव लगड, वि.वि.घोटि ग्रामिणचे राणे, वायरमन व्ही.आर बोडके, संजय लगड, बहिरु लगड, पोलिस पाटिल शरद निर्मळ, कैलास लगड, गोरख निर्मळ आदिंनसह ग्रामस्थांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली. शेतकरी भाऊराव शिंदे यांचा लहाना मुलगा नवनाथ शिंदे हा कँसरच्या विकाराने दोन महीन्यापुर्वीच या शिंदे परिवाराला सोडुन गेला त्यानंतर अशा परिस्थितीत ह्या घडलेल्या  घटनेमुळे संपुर्ण शिंदे परिवारावरती मोठी शोककळा पसरली आहे. ह्या बैलाचा मृत्यु झालेने या शेतकर्‍याची मोठी नुकसान झाली आहे. ही घटना गावात कळताच संपुर्ण स्तरातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दोन महीन्यापुर्विच लहान मुलगा कँसरच्या आजाराने आम्हांला सोडुन गेला. उपजिविकेसाठी असलेलं साधन शेती आणि बैल आणि बैलचं नाही म्हंटल्यावर मी काय करायचं कसं जगायचं.
– भाऊराव शिंदे(शेतकरी)
शेतकरी भाउराव शिंदे यांचा लहान मूलगा दोन महिन्यापूर्वीच कँसरच्या विकाराने त्यांच्या परिवाराला सोडुन गेला त्यानंतर घडलेला ह्या प्रकारामुळे या परिवारावरती मोठी शोककळा पसरली आहे. तरी ही बाब लक्षात घेवुन प्रशासनाने या शेतकर्‍याच्या परिस्थितीचा विचार करुन झालेल्या नुकसानीसाठी मदतीचा हात पुढे करावा व या शेतकर्‍याच्या नुकसानीचा विचार करावा.
– बहिरु लगड

LEAVE A REPLY

*