Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सोशल मिडीयावर इच्छुकाच्यां समर्थकामध्यें ‘सोशल वॉर’

Share

आहुर्ली : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असुन, इच्छुक उमेदवाराचीं पडद्याआड प्रचंड धावपळ सुरु आहे. राजकिय शह काटशहाची रणनिती बनवली जात असुन मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान ईगतपुरी-त्रंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचा केवळ विचार करु जाता सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या वतीने तब्बल अर्धा डझन पेक्षा जास्त इच्छुकाच्यां युद्ध पातळीवर तयारीने उमेदवारी बाबत संभ्रम वाढता आहे.

याच पार्पश्क्षावभूमीवर प्रतिस्पर्धी उमेदवाराचें पत्ते कापण्यासाठी निवडणुकीआधीच सोशल मिडीयावर इच्छुकाच्यां समर्थकामध्यें जोरदार वॉर सुरु झाले आहे, यामुळे राजकिय वातावरण ऐन मुसळधार पावसात कमालीचे तप्त होत आहे तर दुसरीकडे सोशल मिडीयातील या वादावादी मुळे नागरिकाचें मात्र फुकटात मनोरंजन होते आहे.

इगतपुरी-त्रंबकेश्वर विधानसभा मतदार संघातील चुरस कधी नव्हे ती पहिल्यादांच प्रचंड वाढली आहे. अनपेक्षित राजकिय कोलांटउडया व ग्लँमर्स चेहर्याच्यां चर्चेने राज्य पातळीवर ही या मतदार संघाची प्रथमच जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

या मतदार संघाच्या सलग दोनदा प्रतिनिधीत्व करणार्या कॉग्रेसी आ.सौ.निर्मला गावित यांनी आकस्मिकपणे शिवसेनेत प्रवेश केल्याने येथील राजकिय समिकरणे उलटपुलट झाली आहे. यातच देशपातळीवर चमकलेली धावपटु कविता राऊत यांच्याही राजकिय एंट्रीची जोरदार चर्चा सुरु झाल्याने पहिल्यादांच या मतदार संघाच्या निवडणुकिला ग्लँमरही प्राप्त झाले आहे. एकुणच ईगतपुरी-त्रंबकेश्वर विधानसभा मतदार संघाची यंदाची निवडणुक कमालीची गाजण्याचे संकेत मिळत आहे.

दरम्यान निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असुन इच्छुक उमेदवाराचीं पडदयाआड प्रचंड धावपळ सुरु झाली आहे. उमेदवारी मिळवणे, प्रतिस्पर्धी उमेदवाराचें पत्ते कापणे यासाठी पडदयाआड प्रचंड हालचाली सुरु असतानांच दुसरीकडे सोशल मिडीयावर ही इच्छुक उमेदवाराच्यां समर्थकामध्यें जोरदार वॉर सुरु झाले आहे. यामुळे ऐन मुसळधार पावसात ईगतपुरी-त्रंबकेश्वर चे राजकिय वातावरण मात्र कमालीचे तप्त होत आहे तर दुसरीकडे नागरिकाचें मात्र फुकटात मनोरंजन होते आहे.

सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या गोटात इच्छुकाचीं संख्या कमालीची वाढली असुन मोठी चुरस पहायला मिळत आहे, त्यामुळेच पक्षातंर्गत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी इच्छुक व समर्थक यांनी सर्वच पातळीवर बाह्या सरसावल्या आहेत. यात झटपट व सर्वसामान्यापर्यंत पोहचण्याचे प्रचार व प्रसाराचे माध्यम म्हणुन सोशल मिडीयाला सर्वाधीक पंसती आहे. या ठिकाणी इच्छुक व त्यांचे समर्थक यांचेत व प्रतिस्पर्धी उमेदवार व त्यांचे समर्थक यांचेत वर्चस्वाची लढाई सुरु असुन श्रेष्ठत्व सिद्ध करणेबरोबरच दावे, प्रतिदावे व जोरदार शाब्दीक वॉर सध्या पहावयास मिळत आहे.

मतदार संघात स्थानिक विरुद्ध उपरे असा जुनाच वाद पुन्हा चव्हाटयावर आला असुन सोशल मिडीयात यावर घमासान सुरु आहे. तर दुसरीकडे निष्ठावंत विरुद्ध दलबदलु अशीही रंगतदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान आ. गावितानां शिवसेनेकडुन उमेदवारी मिळु नये यासाठी सर्वच इच्छुक उमेदवारानीं कंबर कसली आहे तर दुसरीकडे गावित समर्थकानींही चार चार वेळा पक्ष बदलणारे निष्ठावंत कसे ? असा खडा सवाल करत सोशल मिडीयावर संबधीताचां इतिहासच विशद केला आहे. एकिकडे आ.गावित समर्थक विकासाचे दावे करत आहे तर दुसरीकडे प्रतिस्पर्धीही दुरावस्थेचे चित्र मांडतानां दिसत आहे.

सध्या सोशल मिडियात निष्ठावंत म्हणवणार्याचां चार चार पक्ष बदलाचा कथीत प्रवास,स्थानिक विरुद्ध उपरे, उपसा मधील कथीत घोटाळा, ईगतपुरीत विमानतळ होणार असल्याची पोस्ट, राष्ट्रीय महामार्ग वरिल प्रवासामुळे अंगदुखी बरी होत असल्याची उपहासात्मक पोस्ट आदीनीं धुम माजवली आहे. सोशल मिडीयातील या सुरु असलेल्या वॉर मुळे सर्व सामान्य नागरिकाचें मात्र फुकटात मनोरंजन होते आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!