Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : मुसळधार पावसामुळे घाटनदेवीला भाविकांची धावपळ

Share

इगतपुरी : तालुक्यात आज (दि.५) रोजी दुपारी दोनच्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान घाटनदेवीला आज सातवी माळ असल्याने भाविकांची अलोट गर्दी होती. मात्र अचानक आलेल्या पाऊसामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ झाली.

पावसाचे माहेरघर असलेल्या तालुक्यात जवळपास १६० टक्केच्या वर पाऊस झाला असून अजून ही पाऊस पडत असल्याने बळीराजा देखील चिंता व्यक्त करत असुन ऐन हंगामात हाळी भात सोंगणीसाठी आले आहेत. मात्र या परतीच्या पावसाने दानाफान केल्याने बळीराजा चिंता व्यक्त करत आहे.

तसेच तालुक्याचे भूषण असलेल्या घाटनदेवी व कावनई येथील कामाक्षी माता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सातवी माळ असल्याने जिल्हाभरातून तसेच मुंबई, ठाणे येथून भाविक येत असतात. मात्र परतीच्या पावसाने सुरुवात केल्याने भाविकांची धावपळ झाली होती. विशेष म्हणजे पावसासह विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने देखील थैमान घातले होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!