इगतपुरी शहरातील जुन्या विहिरी स्वच्छ करून लोखंडी जाळ्या बसविण्याची मागणी

0
इगतपुरी : नगरपरिषदेच्या हद्दीतील शहरातील महात्मा गांधी हायस्कूलच्या बाजूलाच एक जुनी विहीर आहे. ही विहिरीचा आकार हा हौदा सारखा आहे, म्हणून त्या विहिरीला हौदच बोलले जाते. परंतु ही विहीर फार जुनी असली तरी या विहिरीला पूर्वी पासूनच जिवंत पाणी आहे. म्हणून जुन्या विहिरी स्वच्छ करून त्यावर लोखंडी जाळ्या बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कितीही दुष्काळ येवो या विहिरीचे पाणी कधीही आटत नाही. या विहिरीचा उपयोग आजू- बाजूचे लोक तसेच इतर नगरातील महिलांना कपडे धुण्यासाठी होतो त्या मुळे ही विहीर म्हणजे येथील नागरिकांसाठी संजीवनीच आहे. परंतु या विहिरीत काही नागरिक देवाला अर्पण केलेले फुलांचे हार पाने टाकून निर्माल्य टाकून तसेच हवेने कचरा उडून पाण्यात पडल्याने या विहिरीचे पाणी खराब झाले आहे हा कचरा पाण्यात साडल्या मुळे येथे दुर्गंधी पसरली आहे.
यामुळे येथील नागरिकांनी वेळोवेळी नगरपालिकेला कळूदेखील कोणीही लक्ष देत नाही म्हणून येथील बाल शिवाजी मित्रमंडळाच्या कऱ्यकर्त्यांनी स्वतः या विहिरीत उतरून पाण्यातील निर्माल्य काढून विहीर स्वच्छ केली.परंतु शहरात आशा कित्तिच विहिरी आहेत. त्या नगरपालिकेने स्वच्छ कराव्यात व त्यावर सुरक्षीत अशी लोखंडी जाळी बसवावी जेणे करून या विहिरीचे पाणी नागरिकांना वापरता येईल. यामुळे नागरिकांना तूर्तास पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही आशि मागणी येथील नागरिक करीत आहेत. यावेळी योगेंद्र शर्मा, विशाल गायकवाड, प्रवीण कदम, बंटी सदगुरू, राजू भाई, आसिफ शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
2 Attachments

LEAVE A REPLY

*