Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : पिकांसह शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी शरद पवार यांची नुकसानीची पाहणी

Share

इगतपुरी : नाशिक जिल्हाचा दुष्काळी दौरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईहुन कारने नाशिकला जात असतांना घोटी टोल नाक्यावर आगमन झाले. यावेळी महामार्गालगत असलेल्या भात शेताच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच जमलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत शासनाकडुन नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली.

यावेळी इगतपुरीचे नवनिर्वाचित आमदार हिरामण खोसकर व देवळाली मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सरोज आहीरे यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

परतीच्या पावसामुळे इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाने इगतपुरी शहरासह तालुक्याला पुन्हा एकदा झोडपल्याने शेतीचे मोठे फार नुकसान झाले आहे. मुख्य भात पीक उत्पादनात अग्रेसर असलेल्या तालुक्याच्या उत्पादनावर पावसामुळे मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे वर्ष भराच्या उत्पन्नावर पाणी फेरले जाण्याच्या भितीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

दुसरीकडे नाशिक जिल्हयातही द्राक्षाच्या उत्पन्नातही घट होणार असल्याचे बोलले जात आहे. द्राक्ष बागांचे झालेले नुकसान लक्षात घेता ते कधीही भरून न निघण्यासारखे आहे. घोटीतील स्वर्गीय गोपाळराव गुळवे यांच्या जयंती निमित्त शरद पवारांनी त्यांच्या पुतळ्याला हार घालुन अभिवादन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!